ढाका : बांगलादेशमधील चट्टोग्राम शहरातील घाऊक बाजारात साखरेच्या दरात पु्न्हा एकदा वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या घाऊक बाजारपेठ अललेल्या खातूनगंजमध्ये गेल्या तीन दिवसांत साखरेचे दर Tk100 प्रती maund (37.32 kilogram) वाढले आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितले की, आयातदारांनी गेल्या आठवड्यात जागतिक बाजारपेठेत केलेल्या बुकिंगच्यावेळी वाढलेल्या किमतीचे कारण देत देशांतर्गत बाजारपेठेत दरवाढ केली आहे. मात्र, घाऊक विक्रेत्यांनी असेही सांगितले की, सध्या बुकिंग केलेले उत्पादन बाजारात पोहोचण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
सद्यस्थितीत खातूनगंजमध्ये एक maund (37.32 किलोग्राम) साखर Tk2,800 मध्ये मिळत आहे. तीन दिवसांपू्र्वी ती साखर Tk2,700 रुपये होती. अशाच पद्धतीने उत्पादनाच्या घाऊक दरात तीन दिवसांत Tk100 प्रती maund दरवाढ करण्यात आली आहे. एस आलम साखर Tk2,800 रुपयांना विकली जात आहे. तर मेघना ग्रुपची फ्रेश ब्रँडची साखर Tk2,780 रुपये आणि सिटीग्रुपची इग्लू ब्रँड Tk2,760 रुपये दराने विक्री केली जात आहे. खातूनगंजमधील घाऊक विक्रेत्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात बुकिंग दर जादा असल्याने गेल्या आठ, नऊ महिन्यांत साखरेचे दर स्थानिक बाजारातही वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांत साखरेचा दर Tk500 प्रती maund पर्यंत वाढला आहे.