ढाका : सरकारने किरकोळ बाजारातील साखरेच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी कमाल विक्री दर (एमआरपी) निश्चित केली असली तरी या बाजारपेठेत साखरेचे दर अद्यापही चढेच आहेत. साखर बाजारातील तीव्र चढ-उतारानंतर सरकारने रिफायनरींसोबत बैठक घेऊन गुरुवारी पॅकबंद साखरेचा दर ७५ टीके प्रती किलो आणि एक किलो साखरेचा दर ७४ टीके असा निश्चित केला. मात्र, स्थानिक प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार किरकोळ बाजारात अद्यापही साखर ८०-८८ टीके किलो अशा चढ्या दराने मिळत आहे. दरम्यान, आपण आपल्याकडील जुना साखरसाठा विक्री करीत असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. या साखरेची खरेदी आपण चढ्या दराने खरेदी केली होती, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेशच्या (टीसीबी) म्हणण्यानुसार, साखरेच्या दरात गेल्या साडेतीन आठवड्यात १६ ते १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. एक वर्षाच्या तुलनेत साखरेचा दर २६ टक्क्यांनी अधिक आहे. कन्झ्युमर असोसिएशन ऑफ बांगलादेशचे (सीएबी) उपाध्यक्ष एम. एम. नजर हुसैन यांनी सांगितले की, एक्स मिल गेट दर आणि ठोक दराच्या समावेशाशिवाय सरकारने निश्चित केलेला ७४-७५ टीके प्रती किलो असा साखरेचा दर (एमआरपी) लागू करणे कठीण आहे. सरकारने साखरेच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी काही महिन्यांसाठी उत्पादनावरील सर्व प्रकारचे आयात शुल्क हटवावे असे मत उपाध्यक्ष हुसैन यांनी व्यक्त केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link