जागतिक टंचाई, कमकुवत शिलिंगमुळे केनियात साखरेचे दर वाढले

जागतिक स्तरावर असलेला साखरेचा तुटवडा आणि डॉलरच्या तुलनेत शिलिंगचे झालेले अवमूल्यन यामुळे केनियात साखरेचा उत्पादन खर्च वाढत असल्याची स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या म्हणण्यानुसार, जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या किमती गेल्या वर्षभरात अस्थिर आहेत. जानेवारीत ५०९ डॉलर प्रती टन असलेला उत्पादन खर्च ऑगस्टमध्ये ५३१ टन प्रती डॉलर झाला आहे.

बिझनेस डेली आफ्रिका या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील वार्षिक तुट भरून काढण्यासाठी केनियाकडून जवळपास २,००,००० टन साखरेची आयात केली जाते. देशातील वार्षिक ८ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत साखरेचा वापर १० लाख टनापर्यंत आहे. केनियाकडून ज्या बाजारपेठेतून वस्तू आयात केल्या जातात, त्या पूर्व आणि दक्षिण आफ्रिकन देशांतून (COMESA) युरोपियन युनियनमध्ये उत्पादन विक्री सुरू आहे. सद्यस्थितीत साखर संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, युरोपियन युनियनमधील साखरेचे दर प्रती टन २० डॉलर जास्त आहेत. याबाबत साखर संचालनालयाचे प्रमुख विलिस ऑडी म्हणाले, “माल इतर बाजारपेठेकडे वळवल्याने साखरेची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ऑगस्टपासूनच साखरेच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. जूनमध्ये दोन किलोच्या पॅकेटचा दर Sh२३० होता तो आता Sh३०० वर आहे. ”

दुसरीकडे देखभालीसाठी दोन कारखाने बंद ठेवल्याने बाजारातील साखरेचा पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा फटका स्थानिक उत्पादनाला बसला आहे. पक्व उसाच्या टंचाईमुळे आणखी काही कारखाने देखभालीसाठी बंद झाल्याने ऑगस्टमध्ये साखरेचे उत्पादन ३४ टक्क्यांनी घसरले. ऑगस्टमध्ये साखरेचे एकूण उत्पादन ४६,४५९ टन झाले. एक महिन्यापूर्वी ते ७०,२७८ टन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here