पाकिस्तानात साखरेच्या किमती वाढल्या

पाकिस्तानमध्ये साखरेचे दर पुन्हा एकदा वाढले असून दोन दिवसात साखरेच्या दरत प्रति किलो 5 रुपयांची वाढ झाली आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी साखरेची किंमत 81 रुपये प्रतिकिलोवर आणल्याबद्दल त्यांच्या आर्थिक संघाचे कौतुक केले होते. त्यानंतर हा विकास झाला आहे.

आता लाहौर, कराची, क्वेटा, मुलतान आणि फैसलाबादसह देशातील बड्या शहरांमध्ये प्रति किलो साखरेचे दर पुन्हा वाढले आहेत.

कराचीच्या घाउक बाजारात 100 किलोच्या साखरेच्या पोत्याची किंमत 8,300 रुपये आहें. तर, ते घाउक बाजारात ही साखर 83 रुपये प्रति किलोने उपलब्ध आहे. शिवाय किरकोळ बाजारात ही साखर 90 रुपये प्रति किलोला विकली जात आहे.

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार महिन्याभरात साखरेचे दर प्रति किलो 11 रुपयांनी वाढले आहेत. कराचीच्या काही भागात साखर 100 रुपये प्रति किलो ने विकली जात आहे.

लाहौरमध्ये साखर प्रति किलो 85-90 रुपये दराने उपलब्ंध आहे, तर क्वेटामध्ये नागरीकांना ही साखर 90 रुपये प्रति किलोने खरेदी करण्यास भाग पाडले आहे. गेल्या महिन्यात हिच साखर 80 ते 85 रुपये किलो होती.

मुलतान आणि फैसलाबाद मध्ये साखरेचे दर 90 रुपयांवरुन 95 रुपये प्रति किलोवर गेले आहेत. साखरेचे दर कमी करण्याची मागणी करणार्‍या नागरीकांनी सांगितले की, युटिलिटी स्टोअरमध्ये कमी दर्जाची साखर 68 रुपये किलो दराने विकली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here