ढाका: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सद्यस्थितीत असलेल्या चढ्या दरामुळे ईद-उल-फित्र नंतर साखरेचे दर पुन्हा वाढू शकतात, असे बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांनी म्हटले आहे. वाणिज्य मंत्र्यांनी गुरुवारी, २२ जून रोजी सचिवालयातील आयुर्वेदिक चिकित्सेवरील एका राष्ट्रीय परिषदेनंतर ही माहिती दिली आहे.
सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढत आहेत. देशातील ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी बांगलादेशला साखरेची आयात करावी लागते.
वाणिज्य मंत्री मुन्शी यांनी सांगितले की, ईदपूर्वी दर वाढणे अथवा कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. ते म्हणाले की, सध्या साखरेच्या आयातीत वाढ होत आहे. त्यामुळे ईदचा सण संपल्यानंतर साखरेच्या किमतीत थोडी वाढ होऊ शकते.
ते म्हणाले की, किमती नियंत्रणात रहाव्यात यासाठी सरकारतर्फे उपाययोजना सुरू आहेत. साकर आणि इतर वस्तूंवरील व्हॅट कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.