पुणे: चीनी मंडी
महाराष्ट्रातील साखर कारखान्यातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामात राज्यात केवळ पूर, दुष्काळच नाही तर आता कोरोना मुळे ही कारखान्यांची गती मंदावली आहे. या हंगामात राज्यातील साखर उत्पादनावरही परिणाम झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कारखान्यांचे गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन कमी झाले आहे.
ISMA च्या मतानुसार, महाराष्ट्रा मध्ये 15 एप्रिल, 2020 पर्यंत 60.12 लाख टन साखर उत्पादन करण्यात आले, तर गेल्या हंगामात याच अवधीत हे उत्पादन 106.71 लाख टन इतके होते. याचाच अर्थ राज्यात 15 एप्रिल पर्यंत 46.59 लाख टन इतके उत्पादन कमी झाले आहे.
महाराष्ट्रात सध्या 10 पेक्षा कमी साखर कारखाान्यात गाळप सुरु आहे. एकूण 146 साखर कारखाान्यांपैकी 67 खाजगी आणि 79 सहकारी कारखान्यांनी महाराष्ट्रात 2019-20 च्या गाळप हंगामात भाग घेतला होता
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.