दुबई : भारतातून यंदा, २०२१-२२ या हंगामात ७५ लाख टन साखर निर्यात होईल अशी अपेक्षा असल्याचे इंडियन शुगर मिल्स अएसोसिएशनचे (ISMA) महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले. गेल्या हंगामाच्या तुलनेत ही निर्यात अधिक असेल. वर्मा यांनी दुबईत साखर परिषदेत बोलताना सांगितले की, आम्ही सध्याच्या हंगामात आधीच ६३ लाख टन साखर निर्यातीच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. हंगाम २०२१-२२ मध्ये भारतीय साखर उत्पादन वाढून ३३३ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत उत्पादनही जादा असेल, असे ते म्हणाले.
वर्मा म्हणाले, आगामी वर्ष, २०२२-२३ बाबत आताच बोलणे हे घाईचे ठरेल. जून आणि सप्टेंबरच्या दरम्यान मान्सून कालावधीत होणाऱ्या पावसाच्या आधारावर काही मिलियन टनाचा फरक पडू शकतो.
इस्माने आपल्या दुसऱ्या संभाव्य अनुमानात महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामातील साखर उत्पादन ११७ लाख टनाच्या तुलनेत १२६ लाख टन (इथेनॉल डायव्हर्शन नंतर) होण्याची शक्यता वर्तविली आहे. अशाच पद्धतीने कर्नाटकमध्ये ५५ लाख टन साखर उत्पादन (इथेनॉल डायव्हर्शन नंतर) होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, युपीसह इतर राज्यांत फारशा बदलाची अपेक्षा नाही. तेथे १५२ लाख टन साखर (इथेनॉल डायव्हर्शन नंतर) उत्पादन होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे २०२१-२२ या हंगामात भारतात ३३३ लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. तर ३४ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली जाईल.