साखर कारखान्यांची संघटना इस्माने सप्टेंबर महिन्यात समाप्त होणाऱ्या हंगाम २०२१-२२ साठी भारतातील साखर उत्पादन ३ टक्क्यांनी वाढून ३१४.५ लाख टन होईल असे अनुमान जारी केले आहे. यापूर्वी हे अनुमान ३०५ लाख टनाचे होते. वर्ष २०२०-२१ च्या गळीत हंगामात ३११.८ लाख टन साखर उत्पादित झाली होती.
भारतीय साखर कारखाना संघाने (इस्मा) सोमवारी आपले दुसरे आगामी अनुमान जारी करताना म्हटले आहे की, देशात २०२१-२२ या हंगामात ३१४.५० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. साखर हंगामाचे वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे असते. इस्माने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा आकडा ऊसाचा रस, सीरप, बी हॅवी मोलॅसीसपासून इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या ३४ लाख टन साखरेच्या संलग्नतेतून आला आहे. मागणीच्या आघाडीवर इस्माने सांगितले की, साखर कारखान्यांनी या हंगामात ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ मध्ये ६९.०६ लाख टन साखरेची विक्री केली आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत झालेल्या विक्रीच्या तुलनेत ही १.५ लाख टनाने अधिक आहे.
साखरेची मागणी वाढण्यासह वर्ष २०२१-२२ मध्ये साखरेचा देशांतर्गत खप २७० लाख टन राहील असे अनुमान इस्माने व्यक्त केले आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत साखरेची निर्यात वाढून १६.२३ लाख टन झाली आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ही निर्यात ४.४९ लाख टन होती. जानेवारी २०२२ मध्ये आठ लाख टन साखर निर्यात होण्यासह या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत एकूण निर्यात २४ लाख टनापेक्षा अधिक होईल अशी शक्यता आहे.