मनिला, फिलीपीन्स : साखर नियामक प्रशासन (एसआरए) च्या नव्या आकड्यांनुसार, डिसेंबर च्या पहिल्या सप्ताहापर्यंत स्थानीक कच्च्या साखरेचे उत्पादन 27 टक्क्यांनी घटून 3,11,617 मेट्रीक टन राहीले आहे. 2018 मध्ये या कलावधीमध्ये साखर उत्पादन 4,29,680 मेट्रीक टन झाले होते. फिलिपीन्स मध्ये साखर हंगाम सप्टेंबर पासून सुरु होतो आणि ऑगस्टमध्ये संपतो.
रिफाइंड साखरेचे उत्पादन 30 टक्क्यांहून घटून 1,10,654 मेट्रीक टन झाले आहे. दरम्यान, साखरेची मिल गेट प्राइस तीन टक्के वाढून P1,515 प्रति ५०-किलो बॅग झाले आहे. नव्या पीक वर्षासाठी जे सप्टेंबर 2019 मध्ये सुरु झाले होते आणि यावर्षीच्या ऑगस्टमध्ये संपेल, फिलीपीन्सला आशा आहे की, ते 2.096 मिलियन मेट्रीक टन साखरेचे उत्पादन करेल. हे गेल्या पीक वर्षासाठी 2.072 मिलियन मेट्रीक टनापेक्षा अधिक आहे.
फिलीपीन्स मध्ये उत्पादित जवळपास सर्व साखरेचा स्थानिक रुपात वापर केला जातो, जिथे घरगुती वापरातील जवळपास 50 टक्के औद्योगिक उपयोग कर्त्यांसाठी, 32 टक्के घरगुती परिवांद्वारा आणि उर्वरीत 18 टक्के संस्थांनांसाठी आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.