अद्दिस अबाबा : इथिओपियन शुगर कार्पोरेशन च्या म्हणण्या नुसार सरकारकडून साखर उद्योगामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनंतर साखर उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. इथिओपियन शुगर कॉर्पोरेशन चे जनसंपर्क प्रमुख गैसाव अचेलुहेम यांनी सांगितले की, सरकारकडून सुधारणांनंतर सुधारित साखर प्रकल्पांना प्राथमिकता दिली आहे. साखर प्रकल्पाबाबत सुधारणा उत्तेजनादायक आहेत आणि इथोपियाच्या बजेट वर्षादरम्यान 3 मिलियन क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. हे उत्पादन गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक आहे. आर्थिक वर्षामध्ये इथेनॉल उत्पादनात दुसरी मोठी उपलब्धी आहे.
फिंचा आणि मेटेहारा साखर कारखाने देशामध्ये एकमात्र इथेनॉल उत्पादक आहेत आणि केवळ या आर्थिक वर्षामध्ये 14.2 मिलियन लीटर इथेनॉल चे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत 6 मिलियन लीटर वाढ झाली आहे. साखर कारखान्यांच्या खाजगीकरण प्रक्रियेबाबात विचारल्यानंतर गैसाव अचेलुहेम यांनी सांगितले की, सरकारने देशामध्ये चहुबाजूंनी केलेल्या सुधारणेनंतर साखर कारखान्यांच्या खाजगीकरणाचा निर्णय घेतला होता. तर खाजगीकरणाची प्रक्रिया कोविड 19 मुळे मागे राहिली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.