ब्राझीलमधील साखर कारखाने इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत आहेत, त्यामुळे साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. बायोस या साखर कंपनीच्या मतानुसार, 2019-20 या हंगामासाठी ब्राझीलच्या दक्षिण भागाच्या परिसरात 25.9 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे, जे 2018-19 मध्ये 26.5 दशलक्ष टन होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या घसणार्या किंमती ब्राझीलला इथेनॉल उत्पादनावर भर देण्यासाठी प्रभावित करत आहेत. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाने किमंती कमी झाल्या आणि गैसोलिनच्या किंमती वाढलयामुळे इथेनॉल उत्पादनाकडे कारखाने वळत आहेत.
मोठ्या मागणीमुळे कारखाने इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाचे मोठ्या प्रमाणात वाटप करतील, अशी आशा आहे. ब्राझीलमध्ये अपेक्षिंत साखर उत्पादनही कमी होण्याची संभावना आहे कारण, साखरेसाठी कारखान्यांकडे ऊसाचे प्रमाण कमी आहे. मोठ्या कंपन्या इथेनॉलच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी गुुंतवणूक करण्यास पुढे येत असल्यामुळे, ब्राझीलमध्ये इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.