जॉर्जटाउन: गुयाना शुगर कॉर्पोरेशन यांनी सांगितले की, त्यांना यावर्षी साखर उत्पादन 89,000 मेट्रीक टन होण्याची आशा आहे. गेल्या वर्षाच्या 90,246 मेट्रीक टनाच्या तुलनेत यावर्षीचे उत्पादन खूपच निराशाजनक होण्याची शक्यता आहे.
या हंगामात होणारे उत्पादन 1926 नंतर सर्वात कमी उत्पादन आहे. यावर्षी 6 डिसेंबर पर्यंत उत्पादन 85,531 मेट्रीक टन होते आणि कंपनीने सांगितले की, दोन आठवड्यामध्ये हंगाम संपण्यापुर्वी 89,000 मेट्रीक टन उत्पादन होवू शकते.