कर्नाटकमध्ये या हंगामात जादा साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ISMA) दुसऱ्या अग्रीम अंदाजानुसार कर्नाटकमध्ये ५५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ISMA च्या म्हणण्यानुसार, २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ७२ साखर कारखान्यांनी या गळीत हंगामात सहभाग नोंदवला आहे. आणि ५०.८४ लाख टा साखर उत्पादन केले होते. तर गेल्यावर्षी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ६६ साखर कारखान्यांनी ४०.८२ लाख टन उत्पादन घेतले होते. ७२ साखर कारखान्यांपैकी ७ कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६६ पैकी ५२ साखर कारखान्यांचे गाळप २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संपुष्टात आले होते.
‘ISMA’ने आपल्या दुसऱ्या अॅडव्हान्स अंदाजात उत्पादनात सुधारणा केली आहे. कर्नाटकमध्ये आता ५५ लाख टन (इथेनॉलसाठी डायव्हर्शननंतर) उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, युपीसह इतर राज्यांमध्ये जास्त बदल होण्याची शक्यता नाही. या राज्यांमध्ये १५२ लाख टन साखर (इथेनॉलसाठी डायव्हर्शनंतर) उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.