महाराष्ट्रात ऊसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत १९८ साखर कारखान्यांपैकी ३४ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. तर गेल्या वर्षी ३ एप्रिल २०२१ पर्यंत १९० कारखान्यांपैकी ११८ कारखान्यांनी गाळप बंद केले होते.
आतापर्यंत राज्यात गेल्या वर्षी ३ एप्रिल २०२१ पर्यंत ९७४.५८ लाख टन ऊसाचे गाळप करून १०२.०१ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत ११५७.३१ लाख टन ऊस गाळप आणि १२०.४४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. या हंगामात साखर उतारा गेल्या हंगामातील १०.४७ टक्केच्या तुलनेत १०.४१ टक्के झाले आहे. प्रती हेक्टर उत्पादन वाढीमुळे १२८ ते १३० लाख टन साखरेचे सर्वोच्च उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन १०७ लाख मेट्रिक टन उत्पाजन झाले होते.
महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, गळीत हंगाम ३१ मे २०२२ पर्यंत सुरू राहिल. यामध्ये मुख्यत्वे मराठवाड्यातील कारखान्यांकडून आपले गाळप सुरू राहील.
ते म्हणाले, कोणत्याही शेतात ऊस शिल्लक राहू नये, अशी अपेक्षा आहे. कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपवला असला तरीही इतर ठिकाणच्या उसाचे गाळप करावे. पुढील हंगामाच्या वेळेवर पिक उत्पादनाच्या तयारीसाठी आमचे प्रयत्न आहेत.