आगामी हंगाम २०२३-२४ मध्ये युक्रेनमध्ये साखरेचे उत्पादन १.६ मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा ब्रोकर Czarnikow ने बुधवारी व्यक्त केली. गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्के उत्पादन अधिक होईल अशी शक्यता आहे. मुख्यत्वे बीटच्या लागवडीत वाढ झाल्याने आणि अनुकूल हवामानामुळे ही वाढ होईल.
Czarnikow च्या अनुमानानुसार जर हे अपेक्षित उत्पादन मिळाले तर देशाकडे जवळपास ५,००,००० टन अतिरिक्त सफेद साखर निर्यातीसाठी उपलब्ध असेल.
युद्धाच्या दरम्यान शेतकऱ्यांना कठीण समस्यांचा सामना करावा लागूनही या वर्षी युक्रेनमध्ये चांगल्या हवामानामुळे इतर पिकांसाठीही पोषक स्थिती आहे.
Czarnikow ने चीन, मेक्सिको आणि ब्राझीलसारख्या इतर महत्त्वपूर्ण विभागातील साखर उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, भारतात उत्पादनात घसरण दिसून येईल अशी शक्यता आहे. मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे.