यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये
नवी दिल्ली : चीनी मंडी
यंदाच्या साखर हंगामात १५ मार्च अखेर, भारतातील साखर उत्पादनात वाढ झाली आहे. सखरर उत्पादन २७३.४७ लाख टन झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी उत्पादन वाढल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे. गेल्या वर्षी याच काळात साखर उत्पादन २५८.२० लाख टन झाले होते. त्यावेळी ३९९ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते, अशी माहिती इस्मा संस्थेने दिली आहे.
‘इस्मा’ने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात ५२७ साखर कारखान्यांमधून १५ मार्च अखेर २७३.४७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्या काळात १५४ साखर कारखान्यांमधील गाळप बंद झाले असून, ३७३ साखर कारखान्यांमध्ये अद्याप गाळप सुरू असल्याचे ‘इस्मा’ने सांगितले आहे.
महाराष्ट्रात १५ मार्च अखेर १००.०८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात या काळात ९३.८४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनात वेगळे चित्र आहे. गेल्या हंगामात या काळात ८४.३९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तुलनेत यंदा ८४.१४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. कर्नाटकमधील साखर कारखान्यांनी ४२.४५ लाख टन साखर तयार केली आहे. तेथे ५६ कारखान्यामधील गाळप थांबले असून, अद्याप ११ कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू आहे. गेल्या हंगामात कर्नाटकमध्ये या काळात ३५.१० लाख टन साखर उत्पादन झाले होते.
तमीळनाडूमध्ये २९ साखर कारखाने आहेत. त्यांतून यंदा ५.४० लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या हंगामात ४.३३ लाख टन साखर तयार झाली होती. गुजरातमध्ये १५ मार्च अखेर ९.८० लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या हंगामात या काळात ९.१० लाख टन साखर तयार झाली होती.
देशातील इतर राज्यांमध्ये साखर उत्पादन झाले असून, तेलंगणमध्ये २५ कारखान्यांतून ६.५ लाख टन, बिहारमध्ये ६.६५ लाख टन, उत्तराखंड २.९५, पंजाब ५.४५, मध्य प्रदेश ४.९० तर, छत्तीसगडमध्ये ४.७५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp