साओ पाउलो : ब्राझीलने इथेनॉलच्या ऐवजी साखर उत्पादनाला गती दिली आहे, ज्यामुळे देशाच्या मुख्य साखरपट्टयात कारखान्यांनी मे च्या शेवटपर्यंत जितके होईल तितके साखरेचे उत्पादन केले आहे. ज्यामुळे एक वर्षापूर्वी च्या साखर उत्पादनाच्या तुलनेत या हंगामामध्ये उत्पादनात 60 टक्क्यापेक्षा जास्त वृद्धी झाली आहे. ब्राझीलने घेतलेल्या या वळणामुळे जागतिक बाजारामध्ये भारतासह अन्य साखर उत्पादक देशांना साखर विक्रीसाठी कडव्या स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो.
ऊस उद्योग समूह युनिका यांनी सांगितले की, ब्राझीलच्या कारखान्यांनी नव्या पिकांच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये 8 मिलियन टन साखरेचे उत्पादन केंले. जे गेल्या वर्षी 4.8 मिलियन टन होते. ब्राझीलचे साखर कारखाने शक्य तितका ऊस साखर उत्पादनासाठी देत आहे.
कोरोना वायरसची प्रकरणे जगात वाढतच आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम अमेरीका आणि प्रमुख साखर उत्पादक दशांपैकी ब्राजीलवरही झाला आहे. कोरोनामुळे देशातील इथेनॉल उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. इथेनॉल उद्योगाच्या नुकसानीमुळे देशातील कारखाने आता साखरेच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.