मनिला : साखर नियामक प्रशासनाकडील (एसआरए) उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील साखर उत्पादनात गतीने वाढ होत आहे. एसआरएने दिलेल्या माहितीनुसार २४ ऑक्टोबरपर्यंत कच्च्या साखरेचे उत्पादन १,८४,६७४ मेट्रिक टनापर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच काळात हे उत्पादन १,३२,७४६ मेट्रिक टन होते. उत्पादनात ३९.१२ टक्के वाढ झाली आहे. फिलिपाईन्समध्ये साखर हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू होतो आणि ऑगस्ट महिन्यात त्याची समाप्ती होते.
एसआरएकडील आकडेवारीनुसार, कच्च्या साखरेची मागणी गेल्या वर्षी याच कालावधीत १,९८,७७६ मेट्रिक टनावरुन ३.३५ टक्क्यांनी वाढून २,०५,४२६ मेट्रिक टन झाली आहे. साखरेचा मील गेट दर १६.९२ टक्क्यांनी वाढून P१७२५.०५ प्रती ५० किलो झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर P१४७५.३७ इतका होता. एसआरएच्या अनुमानानुसार चालू वर्षी कच्च्या साखरेचे उत्पादन २.०९९७ मिलियन मेट्रिक टनपर्यंत पोहोचू शकेल.