लॉकडाउनमुळे उत्तर प्रदेशात वाढले साखर उत्पादन

लखनऊ : अतिरिक्त साखर साठ्याशी झगडत असणार्‍या उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये आता रिकॉर्ड ब्रेक साखर उत्पादन झाले आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे यूपी मध्ये साखर उत्पादनात वाढ झाली आहे. 2018 मध्ये ऊसाच्या 27.94 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेमध्ये 2019 मध्ये 26.63 लाख हेक्टर मध्ये ऊस पिकवण्यात आला होता. यंदाच्या गाळप हंगामात बी हैवी मोलासिस मुळेही इथेनॉलचे उत्पादन वाढले आहे. गाळप हंगाम अजूनही सुरु आहे. उच्च साखर उत्पादनाती प्रमुख कारणांपैकी लॉकडाउन मुळे गुर्‍हाळं बंद होणे, हे एक कारण आहे. या गुर्‍हाळ्यात जवळपास 10 टक्के ऊसाचा वापर होतो, पण हा ऊसही यंदा कारखान्यांकडे पाठवण्यात आला.

यावर्षी अवकाळी पाउस आणि लॉकडाउन मुळे गुऱ्हाळ चालण्यावर विपरीत परिणाम झाला होता. ज्यामुळे तो ऊस कारखान्यांना पाठवण्यात आला होता. लॉकडाउनच्या घोषणेनंतर साखरेचा घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही वापर कमी झाला आहे.

कारोनामुळे साखर उद्योगाला घाईला आणले आहे. पण तरीही साखर कारखान्यांनी या संकटाचा सामना करुन चांगल्या पद्धतीने गाळप केले. ऊस शेतकर्‍यांना नुकसानीपासून वाचवण्यासाठी साखर कारखान्यांना अधिक ऊस गाळप करावा लागला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here