हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नई दिल्ली : ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या व्यापारी वर्षात देशामध्ये साखरेच्या उत्पादनात १४ टक्यांनी घटून २.८२ करोड टन होण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनातील घसरणीमुळे तसेच कमी पावसामुळे महाराष्ट्र व कर्नाटकात ऊसाची कमी असल्याची माहिती उद्योग संघटन इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली.
देशभरात साखर उत्पादन घटले तरी विक्रीच्या तुलनेत २० लाख टन साखर जास्त राहण्याचा अंदाज आहे. दर वर्षी घरगुती साखरेची मागणी २.६५ करोड टन आहे. याशिवाय राखीव साखर मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. इस्मा च्या मतानुसार २o१८-१९ मध्ये साखर उत्पादन ३.२९५ करोड टन एवढा असू शकतो. कारखान्यांनी जूनपर्यंत ३.२८ करोड टन साखरेच उत्पादन घेतल आहे. आणि पुढच्या ३ महिन्यात १ ते १.५ लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे.
इस्मा ने म्हटले आहे की, सॅटेलाईट वरून घेतलेल्या फोटोच्या आधारावर केलेल्या आकलना नुसार २०१९-२० मध्ये ऊस उत्पादन ४९.३१ लाख हेक्टर होऊ शकत जे २०१८-१९ च्या ऊस सत्राच्या ५५.०२ लाख हेक्टर कमी आहे. उत्तर प्रदेशात साखर उत्पादन जवळपास १.२ करोड टन राहील. महाराष्ट्रात ऊस क्षेत्र २०१९-२० साठी ३० टक्याने कमी झाले आहे. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात घट झाली. १८-१९ या आर्थिक वर्षामध्ये १.०७ करोड टन राहण्याची शक्यता आहे.