नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) नुसार, या हंगामातील साखर उत्पादन 15 एप्रिल, 2020 पर्यंत 247.80 लाख टन आहे. गेल्या हंगामात यावेळी हे उत्पादन 311.75 लाख टन इतके होते. या हंगामात 15 एप्रिल, 2020 पर्यंत 139 साखर कारखान्यांचे गाळप सुरु होते, जे गेल्या वर्षीच्या 15 एप्रिल, 2019 पर्यंत 172 कारखान्यांचे गाळप सुरु होते. उत्तर प्रदेशात 15 एप्रिल, 2020 पर्यंत साखर कारखान्यांनी 108.25 लाख टन साखर उत्पादन केले जे गेल्या वर्षा या अवधीत 105.55 लाख टन साखर उत्पादन केले होते. 119 कारखान्यांपैकी 21 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.
महाराष्ट्रात साखर उत्पादनात घट दिसून येत आहे. 15 एपिल, 2020 पर्यंत राज्यात साखरेचे उत्पादन 60.12 लाख टन इतके झाले, जे गेल्या हंगामात या अवधीत 106.71 लाख टन इतके होते. महाराष्ट्रात 136 साखर कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. कर्नाटक राज्यात 15 एप्रिल, 2020 पर्यंत 63 साखर कारखान्यांनी गाळप करुन 33.82 लाख टन साखरेचे उत्पादन केले, जे गेल्या वर्षी याच वेळी 67 साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले होते.
तामिळनाडूूमधील या हंगामात ऊस गाळपात भाग घेणाऱ्या 24 साखर कारखान्यांपैकी 16 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. आणि राज्यामध्ये आतापर्यंत 4.95 लाख टन साखर उत्पादन केले गेले, जे गेल्या वर्षी या अवधीत 6.85 लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. गुजराातमध्ये 15 एप्रिल, 2020 पर्यंत 8.80 लाख टन साखर उत्पादन केले आहे. जे गेल्या हंगामात या अवधीत 11.19 लाख टन साखर उत्पादन केले गेले होते. इतर राज्यात आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, ओडिशा मध्ये सामूहिक पध्दतीने 15 एप्रिल 2020 पर्यंत 31.86 लाख टन उत्पादन केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.