नवी दिल्ली : देशात 2023-24 गाळप हंगाम सुरु झाला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्ये साखर उत्पादनात अग्रेसर मानली जातात. देशातील सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादक राज्य उत्तर प्रदेशमध्ये यंदा साखरेच्या उत्पादन स्थिती काय असेल ? या हंगामात आपण काही आश्चर्याची अपेक्षा करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत साखर उद्योगात तरुणाईचे दमदार प्रतिनिधित्व करणाऱ्या देशातील आघाडीचा साखर उद्योग समूह बलरामपुर चीनी मिल्स लिमिटेडच्या प्रमोटर आणि बिझनेस लीड अवंतिका सरावगी यांच्याकडून.
‘चीनीमंडी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अवंतिका सरावगी यांनी उत्तर प्रदेशमध्ये यंदा साखर उत्पादनात 5% वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज भारतीय शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे आहे. त्या म्हणाल्या की, देशात साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. अवंतिका यांनी यूपीमध्ये उसाच्या SAP मध्ये किंचित वाढ होण्याची शक्यताही वर्तवली..
प्रश्न : उसाचे एकरी क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेशकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? मागील हंगामाच्या तुलनेत जास्त साखर उत्पादनाची अपेक्षा आहे का?
उत्तर : या क्षणी हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. कारण आताच हंगाम सुरु झाला आहे, परंतु आम्ही ISMA ने जाहीर केलेल्या आकडेवारीशी सहमत आहोत. यंदा 5% उत्पादन वाढण्याची शक्यता आहे
प्रश्न : हंगामातील साखरेच्या दराबाबत तुमचा दृष्टिकोन काय आहे? सध्याच्या स्तरावर किमती स्थिर राहतील कि तेथे वाढ होऊ शकते?
उत्तर : मला वाटते की साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामध्ये फार वाढ होण्याची शक्यता नाही.
प्रश्न : उत्तर प्रदेशने SAP वाढवणे अपेक्षित आहे का ? निवडणुका काही महिन्यांवर आल्याने SAP किती वाढवली जाईल? याबाबत तुमची समज काय आहे?
उत्तर : मला वाटते की यूपी सरकारने यापूर्वी SAP बाबतही खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा एफआरपी वाढवूनही SAP वाढवण्यात आलेला नव्हता. SAP आणि निवडणूक जिंकणे यांचा एकमेकांशी फारसा संबंध नाही हे सरकारला चांगले समजते. परंतु असे असले तरी, मला वाटते की SAP मध्ये थोडीशी वाढ होऊ शकते.
प्रश्न : OMCs ने एक मजबूत इथेनॉल खरेदी निविदा जारी केली आहे. सध्याच्या ESY मध्ये उत्तर प्रदेश किती पुरवठा करेल?
उत्तर : या क्षणी हे सांगणे अशक्य आहे. आपल्याला त्यासाठी थोडी वात पहावी लागेल.
प्रश्न : उत्तर प्रदेशमध्ये इथेनॉल उत्पादनासमोर काही समस्या आहेत का?
उत्तर : साखरेच्या उच्च किमती आणि लेव्ही मोलॅसिस धोरणातील बदल इथेनॉल उत्पादन थोडे कमी करू शकते. पण एकंदरीत, मला राज्याच्या इथेनॉल उत्पादनात कोणत्याही मोठ्या समस्या दिसत नाहीत.
प्रश्न : उत्तर प्रदेश आणि देशातील एकूण साखर हंगामासमोर कोणती आव्हाने आहेत? उद्योगासाठी साखरेचा हंगाम सुरळीत चालेल याची खात्री देणारे कोणतेही सरकारी धोरण तुम्हाला त्याकडे पुनर्विचार करायला आवडेल?
उत्तर : मला वाटते की या वर्षी पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भाग लाल रॉटने ग्रासले आहेत, ज्याचा फटका आम्ही एक कंपनी म्हणून सहन केला आहे आणि त्यातून बाहेर पडलो आहोत. त्याचा थोडासा परिणाम गाळप आणि रिकवरी याच्यावर होऊ शकतो. महाराष्ट्र आणि कर्नाटकबद्दल आपल्याला माहिती आहे, कमी पावसामुळे दोन्ही राज्यांना उसाच्या उपलब्धतेची समस्या भेडसावत आहेत.
माझ्या मते, केंद्र सरकारने उसावर आधारित इथेनॉलचे दर लवकर जाहीर करावेत आणि यूपी राज्य सरकारने एसएपी जाहीर करावे. सरकारने साखर आणि इथेनॉलची संपूर्ण मूल्य साखळी ज्या प्रकारे हाताळली आहे. त्याचे मी कौतुक करू इच्छितो.