कोल्हापूर, दि. 6: साखरेच्या दरात सध्या तेजी आहे. तरीही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी एफ आर पी ची रक्कम मिळाले नाही म्हणून अस्वस्थ आहेत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची अस्वस्थता ओळखून तत्काळ या एफ आर पी ची रक्कम अदा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
केंद्र सरकारने किमान 2900 च्या खाली साखर विक्री करू नये असा आदेश काढला आहे. या आदेशानुसार अंमलबजावणीही सुरू झाले आहे .याचवेळी साखरेचा बफर स्टॉक ही करण्यात आला आहे. त्यामुळे साखरेच्या दरात प्रति क्विंटलमागे दोनशे तीनशे रुपयांची सातत्याने वाढ होत राहिली आहे. वाढ झालेल्या रकमेचा फायदा शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कारखान्यांनी आपले आपले व्यवस्थापन सुधारण्याचा धन्यतच मानल्याने शेतकऱ्यांना या एफ आर पी ची रक्कम मिळालेली नाही. यासाठी कारखान्यांनी कोणतीही तडजोड न करता आहे. उसाचा दर दिला पाहिजे अशीही मागणी होत आहे. साखरेचे दर वाढतो पण त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही हे दुर्दैवी असल्याचेही विविध संघटना व पक्षातून बोलले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 11 तर सांगली जिल्ह्यातील चार ते पाच साखर कारखान्यांनी अद्यापही या एफ आर पी ची पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून हा संताप व्यक्त होत आहे.