साखरेचे दर वाढणार

कोल्हापूर, दि. 19 जुलै 2018 : केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पी मध्ये प्रतिटन 200 रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान वाढ केलेली रक्कम देण्यासाठी साखरेच्या दरात ही वाढ करावी लागणार आहे. सध्याचा साखरेचा कमी दर आणि सरकारने केलेली एफआरपी मधील केलेली वाढ विचारात घेतली तर वाढीव एफआरपी देणे कारखान्यांना कठीण होऊन बसणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी प्रति क्विंटल साखरेचा किमान दर 2900 रुपये निश्चित केला आहे. अतिरिक्त खर्च गृहीत धरून खुल्या बाजारात साखर प्रतिक्विंटल 3200 रुपयांपर्यंत जाते. आता ‘एफआरपी’वाढीमुळे या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांनी आणखी वाढ करावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here