महाराष्ट्रात चालू हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर कारखाने सुरू आहेत. हंगाम २०२०-२१ मध्ये १९० कारखान्यांचे सुरू होते. तर आताच्या हंगामात १९४ कारखाने सुरू आहेत.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड विभागात २७ साखर कारखाने सुरू आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये ३० जानेवारी २०२२ पर्यंत ६८.६४ लाख टन ऊस गाळप करुन ६९.०५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १० टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या हा उतारा १०.०६ टक्के आहे.
महाराष्ट्रात एकूण १९४ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यामध्ये ९६ सहकारी तर ९८ खासगी कारखाने कार्यरत आहेत. ७१६.२० लाख टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ७१९.६६ लाख क्विंटल साखर उत्पादन सुरू आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी साखर उतारा १०.०५ टक्के आहे.