लॉकडाउन मुळे गेल्या दोन महिन्यात साखर विक्रीत 10 लाख टनाची घट

नवी दिल्ली: कोरोना वायरस महामारी चा फैलाव रोखण्यासाठी सरकार कडून घोषित केलेल्या लॉकडाउन चा साखर विक्रीवर परिणाम झाला आहे.

इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (ISMA) नुसार, हंगामाच्या पहिल्या 5 महीन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या साखर विक्रीच्या तुलनेमध्ये, या वर्षी साखर कारखान्यांकड्न फेब्रुवारी 2020 पर्यंत डिस्पॅच झालेली साखर 10.24 लाख टन जास्त होती. पण लॉकडाउन मुळे मार्च आणि एप्रिल मध्ये साखरेच्या विक्रीत 10 लाख टन इतकी घट झाली आहे.

कोरोना वायरस मुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. घरगुती आणि वैश्विक साखर विक्रीत घट झाल्याने कारखान्यांसमोर महसुली तरलतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ज्यामुळे कारखाने शेतकऱ्यांंची थकबाकी भागवण्यात अपयशी ठरले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here