नवी दिल्ली : केंद्र सरकारच्यावतीने इथेनॉल मिश्रण धोरणाला प्रोत्साहन दिले जात असल्याने पुढील हंगामात, २०२१-२२ मध्ये देशात साखर उत्पादनात किरकोळ घसरण होऊन उत्पादन ३०.५ मिलियन टनापर्यंत होईल अशी शक्यता आहे. जादा उसाचा वापर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केला जाणार आहे.
याबाबत बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, खाद्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुबोध कुमार यांनी यावेळी उसाची लागवड चांगली असल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे. देशात इथेनॉल निर्मिती करण्यासाठी ऊसाचा वापर केला जाईळ. त्यामुळे २०२१-२२ या हंगामात साखरेचे उत्पादन ३०.५ मिलियन टन होईल.
सुबोध कुमार म्हणाले, सध्याच्या हंगामात २०लाख टन साखरेच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या उसाचा वापर इथेनॉल निर्मिती करण्यासाठी करण्यात आला. तर आगामी हंगामात ३५ लाख टन साखर उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या उसाचा वापर इथेनॉलसाठी केला जाईल. मात्र, साखरेचे उत्पादन देशांतर्गत गरज भागविण्यासाठी पुरेसे ठरेल. त्यामुळे २०२१-२२ या हंगामात साखर ३,००,००० ते ४,००,००० टन वाढून २६.३ ते २६.५ मिलियन टन होण्याची अपेक्षा आहे. २०२०-२१ या हंगामात देशांतर्गत साखरेचा खप २६ मिलियन टन राहील असा अंदाज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link