नवी दिल्ली : देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून अनेक राज्यांतील साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) च्या आकडेवारीनुसार, बिहार, तेलंगणा आणि उत्तराखंडमधील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केला आहे. 2023-24 च्या हंगामात बिहारमधील 9 साखर कारखान्यांनी, तेलंगणातील 6 साखर कारखान्यांनी आणि उत्तराखंडमधील 8 साखर कारखान्यांनी गाळपासाठी भाग घेतला होता.
बिहारमध्ये 6.40 लाख टन, तेलंगणात 1.85 लाख टन आणि उत्तराखंडमध्ये 3.10 लाख टन साखरेचे उत्पादन झाल्यानंतर कारखाने बंद झाले आहेत. तर 31 मार्च 2024 पर्यंत देशातील 209 साखर कारखान्यांमध्ये 2023-24 चा हंगाम सुरू असून आतापर्यंत 2950.14 लाख टन उसाचे गाळप आणि 299.45 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.