हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर , ता. 4 : केंद्र सरकारने प्रति क्विंटल साखरेला 3100 रुपये किमान विक्री दर जाहीर केला आहे. मात्र प्रत्येक्ष बाजारात यापेक्षाही कमी दराने साखर विक्री होत असल्याचे बाजारातील परिस्थिती आहे. त्यामुळे साखरेचे किमान दर वाढविण्यासाठी घोषणा झाली पण अंमलबजावणी मात्र झाली नाही.
महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात ऊस उत्पादकांचे मोठे हाल सुरू आहे. साखरेच्या हमीभावावर उसाचा दर अवलंबून आहे. यासाठी केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी प्रति क्विंटल साखरेचा विक्री दर 2900 रुपये ते 3100 रुपये केला होता प्रत्यक्षात बाजारात मात्र साखरेला बाजारात 2950 ते 3050 रुपयेच मिळत आहेत. यामुळे एफआरपी देण्यास अडचण निर्माण होणार आहे.
साखरेला दर मिळत नसल्यामुळे उसाची एफआरपी देण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे सरकारने आता बाजारावर लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी केली जात आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp