साखर क्षेत्रातील शेअर्समध्ये शुक्रवारी घसरण

नवी दिल्ली : शुक्रवारी दुपारी १२.०५ वाजता साखरेच्या शेअर्सच्या दरात घसरण झाली. काही निवडक शेअर्स प्लसमध्ये राहिले. यामध्ये उगार शुगर वर्क्स (२.९४ टक्के वर), श्री रेणुका शुगर्स (१.५७ टक्के वर), कोठारी शुगर्स अँड केमिकल्स (०.२६ टक्के वर) आणि धामपूर शुगर मिल्स (०.०२ टक्के वर) यांचा समावेश होता.

तर राणा शुगर्स (१३.३५ टक्के डाउन), राजश्री शुगर्स अँड केमिकल्स (४.८१ टक्के डाऊन), केसीपी शुगर अँड इंडस्ट्रीज (४.३६% डाउन), सिंभावली शुगर्स (३.४८% डाउन), मगध शुगर (३.१२% डाउन), उत्तम शुगर मिल्स (२.७७% डाउन), बलरामपुर शुगर मिल्स (२.५५% डाउन), विश्वराज शुगर इंडस्ट्रीज (२.४५%), धरानी शुगर्स अँड केमिकल्स (२.४५%) आणि अवध शुगर (२.४५%) अशी शेअर्सची घसरण झाली होती.

१२.०५ वाजता एनएसई निफ्टी ५० इंडेक्स २५७.० अंक खालावून १७३४८.८५ वर ट्रेड करीत होता. तर सेन्सेक्स ८७४ अंकांनी खालावून ५८०५१.७८ वर ट्रेड करीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here