गेले वर्षभर अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी अतिशय खराब राहिले. अमेरिका मिडवेस्ट मध्ये गेल्या वर्षा दरम्यान खराब हवामान, लुसियाना मध्ये प्रचंड थंडी आणि मैक्सिको मध्ये भयंकर दुष्काळ यामुळे अमेरिकेत साखरेची मोठी कमी जाणवत आहे. परिणामी साखरेचे दर वाढले आहेत. साखरेच्या किंमती सरासरी पेक्षा कितीतरी सेंट वर पोचल्या आहेत. खराब हवामानामुळे उत्तरी डकोटा आणि मिनेसोटा च्या रेड रिवर वैली येथेही याचा मोठा परिणाम जाणवत आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले की जर साखरेची अधिक तंगी राहिली तर ते आपल्या साखर संचलन प्रणालीमध्ये बदल करु शकतील, ज्यामुळे संयुक्त राज्य अमेरिकेत इतर देशांकडून कच्ची साखर आणणे सोपे आणि स्वस्त होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.