जकार्ता : इंडोनेशियामध्ये साखरेच्या रिटेल किंमती जवळपास चार वर्षांपासून सर्वात उच्च स्तरावर पोचल्या आहेत. साखरेची कमी आणि वाढणारे दर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहकांना साखर कमी वापरण्याचे आवाहन केले जात आहे. इंडोनेशियन शुगर एसोसिएशन चे वरिष्ठ सल्लागार , यादी युसियारी यांनी सांगितले की, लॉकडाउनमुळे साखर पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आणि साखर आयात करण्यामध्ये आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
दक्षिण पूर्व एशियाई राष्ट्र इंडोनेशिया कमी स्थानिक पुरवठा आणि वाढती मागणी या दरम्यान साखर आयातीला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा देश इतर देशांच्या तुलनेत थायलंड मधून सर्वात जास्त साखर खरेदी करतो, पण थायलंड मध्येही या हंगामात दुष्काळामुळे साखर उत्पादन कमी झाले आहे. आता भारत, इंडोनेशिया ला अतिरिकत साखर विकण्यासाठी लक्ष ठेवून आहे. पण लॉकडाउन मुळे लॉजिस्टिक समस्यांशी सामना करावा लागत आहे.
यादी म्हणाले, आम्ही साखर आयातीवर अवलंबून आहोत. इंडोनेशियाची वाढणारी लोकसंख्या आणि वाढणाऱ्या मध्यम वर्गाने साखरेसारख्या वस्तूंची मागणी वाढवली आहे. ते म्हणाले, जर आयात कमी करायची असेल, तर ग्राहकांना साखर कमी खावी लागेल. सरकारने घरगुती रिफाइनरी ला उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.