नूर-सुल्तान : कझाकिस्तानला सद्यस्थितीत साखरेच्या मोठ्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. साखरेची टंचाई असल्याने लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. साखरेची टंचाई लक्षात घेऊन राष्ट्रपती कसीम-जोमार्ट टोकायव यांनी सरकारला जोरदार फटकारले आहे. देशांतर्गत साखर उद्योगाच्या विकासासाठी रोडमॅप तयार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
कझाकिस्तान सरकारच्या विस्तारीत सत्राच्या दरम्यान, राष्ट्रपती टोकायव यांनी व्यापार मंत्री बख्त सुल्तानोव आणि कृषी मंत्री येरबोल करशुकेयेव यांना फटकारले आहे. टोकायेव यांनी कॅबिनेटला देशांतर्गत साखर उद्योगाच्या विकासासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. साखरेची आयात हळूहळू कमी केली जावी आणि साखर उत्पादनात देश स्वावलंबी व्हावा यासाठी प्रयत्न करण्यास सुचवले आहे. कजाख राष्ट्रपती टोकायव यांनी सांगितले की, साखर उद्योगात परदेशी गुंतवणुकदारांची रुची अधिक आहे. त्यासाठी योग्य दृष्टिकोणाची गरज आहे. कसीम-जोमार्ट टोकायव यांनी असेही सांगितले की, किराणा दुकानात साखरेचा तुटवडा असणे ही देशासाठी अपमानास्पद बाब आहे.