फिलिपाइन्स शुगर मिलर्स असोसिएशन, Inc. (PSMA) ने मंगळवारी सांगितले की, देशात खरोखरच साखरेचा तुटवडा आहे. सध्याची टंचाई साठेबाजीसारख्या कृत्रिम कारणांनी आलेली नाही.
शुगर मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पाब्लो एल लोब्रेगेट यांनी सिनेटच्या ब्लू रिबन कमिटीच्या सुनावणीत सांगितले की, साठेबाजी आणि तस्करी हे पुरवठ्यातील अडचणींची लक्षणे आहेत. ती कारणे नाहीत. ही बाब कृत्रिम आहे, असे मला वाटत नाही.
राष्ट्रपतींच्या कार्यालयाने आधी सांगितले होते की लुजोनमधील विविध गोदामांमध्ये सीमा शुल्क एजंटांकडून जप्त करण्यात आलेला साखरेचा मोठा साठा, हेच साखरेच्या कृत्रिम टंचाईचे कारण आहे. बेईमान व्यापाऱ्यांनी साखरेची साठेबाजी केल्याने अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले होते.