बीजिंग : चीनमध्ये साखर तस्करीचे प्रमाण वाढले आहे. देशात होत असलेल्या साखरेच्या तस्करीला लगाम घालण्यासाठी चीन मोठया प्रमाणात प्रयत्न करत आहे. नुकत्याच झालेल्या एका कारवाईत, जियानगिन शहरात कस्टम अधिकाऱ्यांनी साखर तस्करी बाबत सांगितले. तब्बल १ हजार टन साखर जप्त केली असून, ९ संशयितांना ताब्यात घेतले आहे. अशा साखर तस्करीच्या अनेक घटना चीनमध्ये सारख्या घडत आहेत.
साखर तस्करी बाबत तयार केलेल्या अहवालानुसार, साखर तस्करी करणारे संशयितांवर कारवाई करण्यात येणार असून, या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी एक जहाज, मोबाइल फोन जप्त केला आहे. तसेच या घटनेशी संबंधीत असणारे बँक कार्ड ही ताब्यात घेतले आहे. कस्टम अधिकारी पुढील तपास करत आहेत.
चीनमध्ये होणारी साखरेची ही पहिली तस्करी नाही. जुलैमध्ये, ५०० टन साखर ताब्यात घेऊन, ७ संशयितांना पकडले होते. ही तस्करीची घटना सूजै मधील कस्टम अधिकाऱ्यांनी उजेडात आणली होती. सूजौमध्ये कस्टम अधिकारी सक्रियपणे पेट्रोलियम उत्पादन आणि साखर तस्करी हटवण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. या शिवाय तस्करीच्या अनेक घटना चीनमध्ये उघड झाल्या आहेत.
१७ जूनमध्ये ही शांघाय मध्ये साखर तस्करीच्या ४o संशयितांच्या २ टोळयांना कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले होते. या कारवाईत ८ मिलियन युआन पेक्षा अधिक किंमतीची २,८०० टन साखर आणि पाच जहाजांना ताब्यात घेतले होते. फेबुवारीपासून या टोळ्या थायलंड मधून साखर खरेदी करून छोटया जहाजांचा वापर करुन आंतरराष्ट्रीय बंदरावरून इतर जहाजांकडून साखर मिळवत होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.