प्रशासनाच्या परवानगीशिवाय विकली गेली साखर, एफआयआर दाखल

बरेली : साखर उद्योग सध्या मोठ्या अडचणीत आहेच, शिवाय ऊस शेतकर्‍यांच्या एफआरपीची बरीच रक्कम कारखान्यांकडे देय आहे. यामुळे शेतकर्‍यांच्यात मोठा असंतोष आहे. असे असतानाच शेतकर्‍यांची फसवणुक झाल्याची घटना समोर येत आहेत. ज्यामुळे शेतकरी दुखावले जात आहेत. यावर योगी सरकार अ‍ॅक्शन घेताना दिसत आहे. प्रशासनाची परवानगी न घेता यदु साखर कारखान्याने साखर विकली आणि मिळणार्‍या धनराशीतून शेतकर्‍यांची थकबाकी भागवली नाही. यामुळे डीएम दिनेश कुमार सिंह यांनी यदु साखर कारखान्याचे प्रबंध निदेशक कुणाल यादव यांच्यासह सुरेश चंद्र जौहरी यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. कुणाल यादव हे उत्तर प्रदेशातील नेता डी पी यादव यांचे सुपुत्र आहेत.

सुजानपूरमध्ये असणार्‍या यदु कारखान्याकडेे ऊस शेतकर्‍यांचे तब्बल 115.52 करोड रुपये अजूनही देय आहेत. तसेच समितीचे 2.06 करोड रुपये अंशत: देय आहेत. इतके दिवस होवूनही शेतकर्‍यांचे पैसे मिळालेले नाहीत, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यदु कारखान्याकडून 1 जुलै 2019 पासून 21 ऑगस्ट 2019 पर्यंत साखरेची विक्री करण्यात आली असूनही शेतकर्‍यांची बाकी देय आहे. यामध्ये अंशत: 9.05 करोड रुपये ऊस मूल्य अथवा समितीला दिले गेले. तर उरलेल्या 8.15 करोड रुपयाचा विनियोग इतर कामांसाठी केला गेला. खरतर हे पैसे शेतकर्‍यांना देण्याचे निर्देश दिले असूनही साखर कारखान्याकडून त्याचे पालन केले गेले नाही.

एसडीएम यांना आदेश दिले गेले आहेत की, साखरेला ताब्यात घेवून विक्रीला मंजुरी देण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा, तसेच आपल्या देखरेखीखालीच साखरेची विक्री करुन शेतकर्‍यांना त्यांची थकबाकी देण्यात यावी.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here