अबुजा (नायजेरिया) : कंपन्यांवर शुगर टॅक्स लावल्याने साखर उत्पादन आणि मार्जीनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे बीयूए फूड्सचे कार्यवाहक कार्यकारी संचालक अयोदेले अबियो यांनी सांगितले. शितपेयांमध्ये साखरेचा वाढता वापर कमी करण्यासाठी नवी घोषणा सरकारने केली आहे. एक आठवड्यापूर्वी या कराची घोषणा सरकारने केली आहे.
नायजेरिया एक्स्चेंज ग्रुपद्वारे आयोजित फॅक्ट्स बिहाइंड द लिस्टिंग इव्हेंटमध्ये अयोदेले अबियो हे बोलत होते. ते म्हणाले, अन्न आमि कृषी संघटनेची (एफएओ) आकडेवारी पाहता आपल्याला अनौपचारिक बाजार अथवा नोंदणी नसलेल्या कारखान्यांच्या माध्यमंतून बाजारात साधारणतः ३,००,००० टन साखर येत आहे. बीयूए फुड्सचे मुख्य वित्त अधिकारी अब्दुल रशीद ओलायवोला यांनी सांगितले की, महसुलामध्ये साखरेचे सर्वाधिक ६३ टक्के योगदान आहे.