सौदी अरब आणि यूएइ मध्ये बिगर कार्बोनेटड गोड पेयांवर उत्पादन शुल्क लागू केल्यामुळे विम्टो शीत पेया ची निर्माती कंपनी निकोल्स यांनी पुढच्या वर्षी कंपनीचा नफा कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
निकोल्स यांनी सांगितले की, सौदी अरब आणि यूएइ मध्ये साखरेवर कर लावल्यामुळे 2020 मध्ये कंपनीला करपूर्व लाभ अपेक्षेपेक्षा कमी राहील असा अंदाज आहे. या देशांमध्ये लागू होणारा 50 टक्के उत्पादन कराच्या भरपाईसाठी त्यांना आपल्या पेय पदार्थाच्या किंमतीत वाढ करावी लागू शकते, ज्यामुळे कंपनीच्या 2020 च्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, यूएइ मध्ये पुढच्या वर्षीच्या 1 जानेवारीपासून, तरल, केंद्रीत, पाउडर, अर्क किंवा साखर असणार्या कुठल्याही पेय पदार्थाच्या उत्पादनावर 50 टक्के कर लावला जाईल.
साखरेवर कर लागू होण्याबरोबरच, यामुळे देशातील साखर उपयोगावर परिणाम होवू शकतो. ग्राहकांना साखर पेयासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. सरकारचे लक्ष्य आहे की, साखरेचा वापर कमी करुन निरोगी आयुष्याच्या दृष्टीने होणार्या प्रयत्नाला गती मिळावी.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.