कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने धुमाकूळ घातला. यामध्ये शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आणि तसेच त्याचबरोबर पूर्ण दक्षिण महाराष्ट्रातील ऊसाचे वैभव लयाला गेले आहे. कष्टानं आणि घामानं पिकवलेल्या शेतीची अवस्था आज न बघविणारी आहे. महापुराच्या पाण्यामुळे ऊस शेतीला खूप मोठा फटका बसला आहे. सलग आठ दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे शेती अक्षरश कुजत आहे व पुराच्या पाण्यासोबत असणारी माती पानावरती राहिल्यामुळे उसाचे प्रकाश संश्लेषण होत नाही आहे त्यामुळे पिके करपत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात ऊस हे एक प्रमुख पीक आहे. देशातील साखर उताऱ्यामध्ये नेहमी अग्रगण्य आहे. गेल्या आठ दिवसात महापूर आला आणि ओसरला. आणि जाताना शेतकरी आणि साखर कारखान्यांचा तोंडचा घासच पळवून घेऊन गेला. कोल्हापुरातील करवीर, शिरोळ, राधानागरी, हातकणंगले, कागल या चार तालुक्यात सर्वात जास्ती ऊस उत्पादन होते. आणि हेच जिल्हे सर्वात जास्ती महापुराच्या तडाख्यात सापडले याचा परिणाम येणाऱ्या गळीत हंगामावर होणार आहे. चिनीमंडी कडून केलेल्या पूरक्षेत्र बाधित शेती क्षेत्राच्या सर्वे नुसार, जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना तब्बल १८००-२००० कोटींचा फटका बसणार आहे. तर उत्पादनात सरासरी ३०-३५ टक्के घट होणार असल्यामुळे जिल्यातील मातब्बर कारखाने ही हतबल झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांना २८०० रुपये सरासरी FRP दिली जाते. सद्य स्थितीतील ऊस क्षेत्रात पाणी असून त्यावरील मातीमुळे वाळत चालला आहे त्यामुळे खराब झालेला ऊसही गाळपास आणावा लागणार आहे, परिणामी प्रक्रिया खर्चात वाढ होणार आहे. आणि नवीन आडसाली लावणी बुडाल्याने पुढील हंगामात ऊसासाठी पुन्हा झगडावे लागणार आहे.
अशीच काहीशी परिस्तिथी गुराळघराची आहे. गाळपासाठी ऊसाचा तुटवडा पडणार आहे आणि मुख्य म्हणजे गुराळ घराची चिमणी पेटवण्यासाठी सुद्धा जळनाचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी गुराळ घराची चिमणी पेटणार का याबाबत शंका आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.