लॉक डाऊन दरम्यान साखर व्यापारी आणि कारखान्यांना पुरवठा करण्याचा मार्ग सुखकर करण्यामध्ये चीनीमंडीचा पुढाकार

कोरोना वायरस मुळे देशातल्या साखर उद्योगावर खूप मोठा परिणामझाला आहे. भारतात कोरोना चा धोका ओळखून १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉक डाउनची घोषणा केली आहे. अशा वेळी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणे महत्वाचे आहे. पण लॉकडाउन मुळे अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

साखर देखील अत्यावश्यक गोष्ट आहे, जी आपल्या डिलीवरी लोकेशन वर पोचणे गरजेचे आहे. ही वस्तू वेळेवर आपल्या नियोजीत स्थळी पोचण्यासाठी चीनी मंडीने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर पुरवठा करताना या संबंधित लोकांना कोणताही अडथळा येउ नये यासाठी ही चीनी मंडी प्रयत्न करत आहे.

कोरोनाच्या गंभीर संकटा दरम्यान, साखरेच्या पुरवठयामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, या संदर्भात चीनी मंडी ने कोल्हापूरचे जिल्हााधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, कोणत्याही साखर व्याापारी किंवा पुरवठादाराला देशातल्या लॉक डाऊन दरम्यान साखरेच्या पुरवठया मध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही, कारण साखर एक आवश्यक वस्तू आहे.

ते म्हणाले, साखर व्यापारी या पुरवठादार संघाला आपल्या संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहायला हवे, जिथे त्यांना ओळखपत्र दिले जाईल जे त्यांना आपला व्यापार आणि पुरवठा सुरु ठेवण्याची परवानगी देईल.

कोरोना वायरस साखर उद्योगावर विविध प्रकारे परिणाम करत आहे. वायरस च्या प्रसारामुळे कारखान्यांंतील साखर विक्री कमी झाली आहे, ज्यामुळे कारखाने आणि व्यापाऱ्यांसमोर अर्थिक संकट उभे राहिले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here