कोल्हापूर, दि. 15 जून : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज नंतर आणि 2900 रुपयांच्या खाली साखर विक्री करू नये या सूचनेमुळे साखर उद्योगात काहीशी तेजी आली आहे. साखरेचे प्रतिक्विंटल चे दर वाढले आहेत. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने प्रति क्विंटल साखर मूल्यांकनाचे दर दोनशे रुपयांनी वाढले याबाबतचे पत्र सर्व कारखान्यांना देण्यात आले आहेत.
हा साखर दर वाढल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. प्रतिक्विंटल साखरेचा दर 2700 गृहीत धरूनच मूल्यांकन केले जात होते. सध्या साखर दर वाढल्याने
प्रतिक्विंटल 200 रुपयांनी वाढ केली बँकेने मूल्यांकन दरात वाढ करावी, अशी साखर कारखान्यांची मागणी होती.
त्यानुसार काल गुरुवारी ( दि.14) बँकेने मूल्यांकनात वाढ केली आहे. प्रचलित 2700 रुपये असणारा दर 2900 रुपये करण्यात आला आहे.
वाढलेल्या मूल्यांकन उत्पादकांना देणे देण्यास सुलभ होणार आहे. मूल्यांकन वाढीचा फायदा
कारखान्याना होणार आहे. राज्यातील थकीत एफआरपी देण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. मागील थकबाकी देण्याबाबत अडचणी आल्या असल्या तरी नव्याने जाहीर केलेले मूल्यांकन कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहे.