साखर संहसंचालकांडे तक्रारी : टनापेक्षा 200 ते 250 किलो जास्त ऊस घेतात
कोल्हापूर, दि. 10 स्पटेंबर 2018 : एफआरपीची रक्कम वाढत असताना साखर कारखाने उसाच्या वजन काट्यामध्ये गोलमाल करून प्रति मेट्रिक टन उसामागे 200 ते 250 किलो ऊस जास्त घेत असल्याची तक्रार वारंवार होत आहे. प्रादेशिक साखर सह संचालकांकडेही याची तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे, उसाचा हंगाम सुरू होण्याआधी साखर कारखान्यांकडे असणारे डिजटल वजन काटे तपासले जाणार आहेत. तसेच, उसाचा मुख्य हंगाम सुरू झाल्यानंतरही संबधीत अधिकार अचानक धाड टाकून कारखान्यांच्या डिजिटल वजन काट्यांची तपासणी करणार आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून अनेक तक्रारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातकडे यापूर्वी आणि आताही आल्या आहेत. शेतकरी, संघटना तसेच काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे 2018-19 च्या गळीत हंगामात मात्र, उसाच्या वजन काट्यांबाबत गांर्भियाने दखल घेतली जाणार आहे. प्रतिवर्षी उसाच्या एफआरपीची रक्कम वाढत आहे. शेती उत्पादन खर्चातही दिवसें-दिवस वाढ होत आहे. वाढणाऱ्या खर्चाचा आणि दराचा ताळमेळ लागत नाही. यातही साखर कारखान्यांचीच भर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच काही साखर कारखान्यांविरूध्द तक्रार दाखल झाल्या आहेत.