आवताडे शुगर यंदा करणार ५ लाख मे. टन ऊस गाळप : चेअरमन संजय आवताडे

सोलापूर : अवताडे शुगरने गेल्या वर्षी शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या बळावर ४ लाख ४ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा पैसा मिळावा यासाठी नेहमीच कारखान्याने जास्तीत जास्त ऊस दर दिलेला आहे. यावर्षीही उसाला चांगला दर देण्याचा आपला मानस असून शेतकऱ्यांनी आवताडे शुगरलाच ऊस घालावा, असे आवाहन आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले. नंदुर येथे कारखान्याच्या तृतीय बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावर्षी कारखान्याने पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक पगार बोनस देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

चेअरमन संजय अवताडे यांनी सांगितले की, पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगरने नेहमीच शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देत शेतकऱ्यांचे समाधान केलेले आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात कारखान्यास सर्वाधिक ऊस घातलेल्यासचिन चौगुले, शामराव ढाने, दयानंद दत्तू, ज्ञानेश्वर मुकणे, माणिक इंगळे, बाळासाहेब गडदे, पांडुरंग माने, किसन आसबे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन व सत्यनारायण महापूजा करण्यात आली. यावेळी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे माजी संचालकभारत निकम, विजय माने, बापू काकेकर, मारापुरचे सरपंच विनायक यादव आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here