मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योगाने आता चांगलीच गती घेतली आहे. यावर्षी हंगाम वेळेआधीच सुरू केल्याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहेत. राज्यात साखरेचा उतारा १० टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सरासरी साखर उतारा ९.७९ टक्के इतका आहे.
साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी २०२१ पर्यंत १८२ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ५६०.३६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून साखरेचे उत्पादन ५६०.३६ क्विंटल इतके झाले आहे. यावर्षी महाराष्ट्रात जादा उसाची उपलब्धता आणि गळीत हंगाम वेळेवर सुरू झाला असल्याने यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर उत्पादन होण्याचे अनुमान काढले जात आहे. सद्यस्थितीत सोलापूर विभागात सर्वाधिक ४० साखर कारखाने सुरू आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर विभागात ३७ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे.