ऊसदर आंदोलन : बहे-बोरगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची सोडली हवा

सांगली : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रति टन ४ हजार रुपये दर आणि दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करावा, अन्यथा महाराष्ट्रात ऊस आंदोलन तीव्र करू, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेने दिला. संघटनेचे नेते गणेश शेवाळे यांच्या उपस्थितीत बहे-बोरगाव येथे उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून त्यातील हवा सोडण्यात आली. सरकार लाडक्या बहिणीला पैसे देते, निवडणुकीवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, दिवाळीला शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांची लूट का करता, असा सवाल यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस तोडणी सुरळीत सुरू असताना बळिराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी बहे येथे ऊस आंदोलनाची ठिणगी टाकली. विधानसभा निवडणूक पार पडताच बळिराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आंदोलनात हसन मुल्ला, शहाजी पाटील, अशोक सलगर आदींसह शेतकरी, कार्यकर्त्यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here