२० % इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ ऊस पुरेसा नाही

नवी दिल्ली : २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी फक्त ऊस पुरेसा ठरणारा नाही, असे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोपडा यांनी सांगीतले. भारतात डिस्टिलरी मोलॅसीसपासून इथेनॉलचे उत्पादन करतात. हे साखरेचे एक उप उत्पादन आहे. मात्र, केवळ ऊस २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यास पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे खराब धान्य (DFG) आणि भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) उपलब्ध तांदळापासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे.

चोपडा यांनी मक्का आणि इथेनॉलवर आयोजित एका सेमिनारला संबोधीत करताना सांगितले की, २०२५ पर्यंत पेट्रोलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जवळपास १०१६ कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल आणि इतर उपयोगासाठी जवळपास ३३४ कोटी लिटर इथेनॉलची गरज असेल. इथेनॉल उत्पादनासाठी अन्नधान्याची गरज जवळपास १६.५ मिलियन टन (MT) असेल. चोपडा यांनी सांगितले की, धान्यावर आधारित डिस्टिलरीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी किमान समर्थन मूल्यावर (एमएसपी) मक्क्याची खरेदी आणि पूर्ण क्षेत्रात एक विकसित परिस्थितीकीय तंत्राची गरज आहे.

जागतिक स्तरावर, मक्का इथेनॉल उत्पादनासाठी एक प्राथमिक फीडस्टॉक आहे, कारण यामध्ये पाण्याचा वापर कमी असतो आणि ते किफायतशीर आहे. मात्र, भारतात इथेनॉल उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून मक्क्याचा वापर करण्यात अद्याप गती येणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत धान्यावर आधारित डिस्टिलरीत एकतर DFG सारख्या तुकडा तांदळाचा वापर करून धान्यापासून इथेनॉलचे उत्पादन होत आहे. भारतात धान्यावर आधारित डिस्टिलरींद्वारे मक्क्यापासून इथेनॉल उत्पादन मुश्किलीनेच होत आहे. मक्क्यावर आधारित इथेनॉल अधिक किफायती आणि पाण्याची बचत करणारे आहे.

देशात मक्क्याचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. मात्र, मक्क्याच्या कमी मागणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पदनाचे योग्य मूल्य मिळत नाही. मक्क्यापासून इथेनॉल उत्पादनाने मक्क्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल. निर्यातीच्या मागणीमुळे सध्या मक्याचा दर उच्चांकावर आहे. मक्का बाजार मूल्यामध्ये नेहमी एमएसपीपेक्षा कमी असतो. त्यामुळे शेतकरी मक्क्याचे कमी पिक घेतात. केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी देशात मक्क्याच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक लक्ष देण्यासह विशिष्ट दृष्टिकोन असल्याची गरज व्यक्त केली.

पर्यावरणपूरक इंधनावर भर देताना केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे E२० मिश्रण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, त्यातून शेतकऱ्यांचे हित साधण्यासह भारताला स्वच्छ इंधन मिळू शकेल. इथेनॉलसारखे पर्यावरण अनुकूल इंधन पंतप्रधान मोदी यांची सर्वोच्च प्राथमिक आहेत, त्यामुळे गेल्या दोन वर्षात इथेनॉल मिश्रण दुप्पट झाले आहे. त्यांनी दावा केला की, गेल्या नऊ वर्षात गेल्या हंगामात शेतकऱ्यांना ९९.९ टक्के ऊस बिले देवून साखर क्षेत्र आत्मनिर्भर बनले आहे. गोयल यांनी सांगितले की, आता इथेनॉल मक्का उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकण्यास मदत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here