कुशीनगर: उत्तर प्रदेशातील कुशीनगर मध्ये गेल्या काही वर्षांनंतर यावेळी गाळप हंगामाध्ये ऊसाचे क्षेत्रफळ घटले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ऊसाचे क्षेत्रफळ 9,610 हेक्टर कमी झाले आहे. याच्या मागे अधिक पाऊस आणि ऊसावर पडलेला रेडरॉट नामक रोग अशी कारणे सांगितली जात आहेत.
सूत्रांनी सांगितले की, गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये 1,00,727 हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊसाची शेती करण्यात आली होती. 2,52,360 शेतकर्यांनी साखर कारखान्यांना ऊसाचा पुरवठा केला होता. यावर्षी ऊस विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये 91,117 हेक्टर क्षेत्रफळामध्ये च ऊस मिळाला. क्षेत्रफळामध्ये 9.54 टक्के घट नोंद करण्यात आली. यावर्षीच्या सर्वेक्षणात 2,54,735 शेतकरी मिळाले, ज्यांनी ऊस शेती केली आहे, पण यावर्षी शेतकर्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.