शामली : जिल्ह्यामध्ये झालेल्या सॅम्पल सर्व्हेचे निष्कर्ष समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाची लागण २.३४ टक्क्यांनी वाढली आहे. पूर्ण जिल्ह्यात अद्याप सर्व्हे सुरू असून तो ३० जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ही आकडेवारी निश्चित होईल.
जिल्ह्यातील थानाभवन, शामली आणि ऊन हे साखर कारखाने आहेत. यासोबतच तितावी आणि खतौली साखर कारखान्यांना काही गावांतील शेतकरी ऊस विकतात. या कारखान्यांचे ऊस खरेदी केंद्रे आहेत. थानाभवन आणि ऊन साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची समाप्ती मे महिन्यात करण्यात आली. शामली कारखान्याचा हंगाम मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झाली. पेरणी हंगाम समाप्त झाल्यानंतर साखर कारखाने आणि ऊस विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, सॅम्पल सर्वेक्षणासाठी ४५ गावांची निवड करण्यात आली. हा सर्व्हे क्षेत्रफळ आणि ऊसाच्या पिकाची स्थिती जाणण्यासाठी करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस रोप लागणीत ८.८१ टक्क्यांची वाढ आणि खोडवा पिकात ३.०४ टक्क्यांची घट झाली आहे. एकूण क्षेत्रफळ २.३४ टक्के वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळात १३ टक्क्यांची वाढ झाली होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पिक स्थिती चांगली आहे. खोडवा उसाला अधिक चांगला वेळ, वातावरण मिळत असल्याने उत्पादनात वाढ होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक डॉ. विकास मलिक यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link