तिरुचिरापल्लीत ऊस लागवड क्षेत्र वाढण्याचे अनुमान

तिरुचिरापल्ली : जिल्ह्यातील ऊस शेतीचे लागवड क्षेत्र वाढल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हंगामात जवळपास ३६० हेक्टरचे अतिरिक्त क्षेत्र ऊस शेतीखाली आले आहे. जिल्ह्यात NPKRR सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन झाल्याने शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळले आहेत. गेल्या महिन्यात विधानसभा समितीने कारखान्याची पाहणी केली होती. आणि कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन करून आपले काम सुरू ठेवले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात आणि परिसरात १० हजार एकरात ऊस शेती केली जाते. आणि मयिलादुथुराई, नागपट्टिनम आणि तंजावूर या जिल्ह्यात जवळपास २,८०० ऊस उत्पादकांनी साखर कारखान्याशी नोंदणी केली आहे. राज्यभरातील शेतकरी संघटना राज्य सरकारकडे केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमातून होणाऱ्या लाभासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह करीत आहेत.

केंद्र सरकारने जैव इंधनाबाबतच्या राष्ट्रीय धोरण २०१८ मध्ये अधिसूचित केले आहे, ज्यामध्ये देशात २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्के आणि डिझेलमध्ये ५ टक्के बायोडिझेल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. इथेनॉलच्या पुरवठ्याला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे केंद्र सरकारने २०३० मधील आपले २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट घटवून २०२५-२६ या वर्षावर आणले आहे. इंधन वितरण कंपन्यांनी (OMCs) तोट्यात असलेल्या राज्यांमध्ये इथेनॉल प्लांटची स्थापना करण्यासाठी संभाव्य प्रकल्प ऑपरेटर सोबत दीर्घकालीन इथेनॉल ऑफ-टेक करारांवरही स्वाक्षरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here