नंदुरबारमध्ये उसाच्या क्षेत्रात होतेय वाढ

नंदुरबार : जिल्ह्यात यंदा ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. पपई, केळी आदी पिकांना पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य देण्यात येत आहे.ऊस हे बारमाही पीक असून, त्याला मोठ्या प्रमाणात खत, उसाचे महागडे बियाणे, लागवडीचा खर्च, निंदणी, ठिंबक सिंचन आदी खर्च येतो.त्यातच महागाई वाढल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.खताची एक हजार ५० रुपयांना मिळणारी बॅग आता एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांवर जाऊन पोचलेली आहे. त्यातच डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चदेखील दीडपटीने वाढला आहे.एकीकडे महागाई गगनाला भिडली असताना दुसरीकडे उसाला मात्र योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या भरडला जात आहे. लहरी हवामान, पाऊस, ढगाळ वातावरण आदी नैसर्गिक घटक शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच घालत आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांचा ऊस पिकाकडे कल वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here